ब्रम्हपूरी ( Bramhapuri ) :- वैनगंगा नदी ( Wainganga river ) पात्रातील पाण्यातून मार्गक्रमण करून शेतीवर जात असतांना तालुक्यातील पिंपळगाव (खरकाडा) (Pimpalgaon (Kharkada) येथील महिला पाण्यात वाहून गेल्याची घटना दिनांक १४ मार्च रोजी सोमवारला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली.
गिता हरिदास भरै (५५) असे वाहून जाणाऱ्या महिलेचे नाव आहे. घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलिस ( Brahmapuri police ) करीत आहेत.