ठाणे : जर तुम्ही तुमच्या १८ वर्षाखालील मुलांचा वाहन चालवण्याचा हट्ट पुर्ण करत असणार तर तुम्हाला ते महागात पडू शकतं. कारण १८ वर्षाखालील मुलांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास त्यांच्या पालकांना दंड भरावा लागणार आहे. डोंबिवली वाहतूक विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे.
१८ वर्षाखालील मुलांच्या हातात वाहन चालवायला दिल्याने डोंबिवलीत पालकांना थेट कारवाईला सामोरे जावे लागले आहे. डोंबिवलीत वाहतुक नियमांचे उलघणं करणाऱ्यावर वाहतूक विभागाकडून सतत कारवाई केली जात आहे. यातच आता १८ वर्षाखालील मुले सरार्स पणे वाहनचालवताना आढळून येत आहेत. यामुळे वाहतुक पोलिसांनी या मुलांच्या पालकांना संपर्क साधत थेट वाहतूक विभागाच्या कार्यालयात बोलवून घेत, त्यांच्या पाल्याने केलेल्या वाहतुक नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी पाच हजारा ते दहा हजारा पर्यन्त दंड पालकांकडून आकारण्यात आला आहे.तसेच त्याचवेळी त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे. आणि जे पालक आपल्या १८ वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यासाठी देत असतील तर त्यांना यापुढील कारवाईसाठी सामोरे जावे लागणार असल्याचे डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्याकडून सांगण्यात आले आहे.