चिमूर:- तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी वैभव बापूराव नाकाडे (२३) याला विनयभंग व अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन पीडित नेहमीप्रमाणे ७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास चिमूर येथे सायकलने कॉलेजला जाऊन परत येत असताना आरोपीने मुलीचा दुचाकीने पाठलाग केला. नंतर तिला गाठून रस्त्यावर पाडले व विनयभंग केला.
पीडितेने याप्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम ३४१, ३५४, ३५४(ब) ३५४ (ड) (१) ३३६, ३३७, भांदवि सहकलम ८ ले.अ. बा.सं अधी. २०१२ सहकलम ३ (१) (डब्ल्यू) (आय) (आय आय), ३ (२) (व्हीए) अ.जा. ज.अ.प्र.का. सुधारित अधिनियम २०१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनोज गभणे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश मोहोड, साहाय्यक पोलीस निरीक्षक अलीम शेख करीत आहे.