१९ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य |
भंडारा ( Bhandara ) : १ ९ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा तालुक्यातील नेरोडी येथे सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मंजू विनोद कुंभरे ( १ ९ ) रा . नेरोडी ता. भंडारा असे मृत तरुणीचे नाव आहे .
सोमवारी घराच्या बेडरुममध्ये असलेल्या सिलिंग फॅनला तिने ओढणी बांधून तिने गळफास लावून घेतला. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच कारधा पोलीस ठाण्यात या घटनेमी माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तिने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे सध्या कळू शकले नाही .