|
तुम्ही माझे लग्न गरीब घरात का केले ? |
जलालखेडा ( Nagpur ) : लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यतील महत्वाचा भाग आहे. हा तिच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. परंतु, जर हा निर्णय चुकला तर, आयुष्यभर पच्छाताप करावा लागतो. तसेच, आपल्या लग्नात आपण समाधानी असणं फारच आवश्यक असत. अशाच एक मुलीने आपल्या लग्नाच्या बाबतीत असमाधान व्यक्त करत आत्महत्या (Suicide) केली आहे. हरिदास( Haridas) तिचा नवरा हा गरीब घरातील आहे. त्याला २०२० मध्ये शिक्षक म्हणून सरकारी नोकरी लागली. त्याला केवळ सहा हजार रुपये मानधन मिळत होते. लग्नानंतर तो जलालखेडा येथे किरायाने राहायला आला होता. तो वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत जायचा तर, मुलगी गृहिणी होती.
हे देखील वाचा:
|आत्महत्या | भंडारा हादरलं ! कॉलेजमधून येताच बारावीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
आपल्याला सरकारी नोकरीवर असणारा मुलगा नवरा म्हणून मिळावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यानुसार अश्विनीच्या (Ashwini) आई-वडिलांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक (Teacher in Z. P. school) असणाऱ्या हरिदास रणमले ( Haridas Ranmale) (रा. घानमुख, ता. महागाव,) (Ra. Ghanmukh, Ta. Mahagaon) या मुलाशी लग्न करून दिले. २९ डिसेंबर २०२१ रोजी अश्विनी व हरिदास यांचे लग्न मोठ्या थाटा माटात लग्न झाले. परंतु, मुलीकडील सर्व उच्चशिक्षित व नोकरीवर होते.
अश्विनीच्या डायरीतील मजकुर
ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले, तो माझ्या जीवनातील काळा दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून दिले. (
Why did I get married in a poor house ? ) मैत्रिणी माझ्यापेक्षाही गरीब असताना त्यांचे लग्न श्रीमंत घरी व उच्चशिक्षित मुलाशी झाले. परंतु, माझे कुटुंब उच्चशिक्षित असूनही माझे लग्न गरीब घरात केले.’ या सर्व विचारांनी तिच्या मनात नैराश्य दाटल्यामुळे अश्विनी हरिदास रणमले (वय २५) हिने आत्महत्तेचे टोकाचे पाऊल (
suicide ) उचलल्याचे तिच्या डायरीतून कळत आहे.