विद्युत खांब तुटून मजुराचा मृत्यू
तुमसर ■ विद्युत खांबावर तार जोडण्याचे काम करीत असतांना अचानक खांब तुटून खाली असलेल्या मजुर जखमी होऊन मृत्यू झाला. घटना तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथे दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली. पुष्पम भाष्कर शरणागत (२१) रा. सिहोरा असे मृत मजुराचे नाव आहे. सिहोरा येथील पुष्पम शरणागत हा मागील सहा महिन्यांपासून एका कंत्राटदाराकडे विद्युत विभागाच्या कामावर होता.
हे देखील वाचा:
दि. ७ फेब्रुवारी रोजी सितासावंगी येथे सिमेंट विद्युत, खांबावर तार लावण्याचे काम सुरू होते. एक मजुर खांबावर चढून तार कसत असतांना अचानक सिमेंट खांब तुटला. तुटलेला खांब हा खाली असलेल्या सदर पुष्पम शरणागत याचे अंगावर पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाला. जखमीला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. सहाय्यक फौजदार माहुर्ले यांचे तक्रारीवरुन तुमसर पोलीसात मर्ग दाखल केला आहे.