वीज केंद्र परीसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले
चंद्रपूर:- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कामगारावर वाघाचा हल्ला झालाय. रात्री 10.45 वाजताच्या सुमारास भोजराज मेश्राम या कामगाराला वाघाने उचलून नेले. कोळसा वॅगन अनलोडिंग परिसरात जात असताना हा हल्ला झालाय. त्यामुळे या परिसरात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन दिवसापासून या भागात वाघ फिरत होता. काल रात्री पण या भागात वाघ फिरत होता. वीज केंद्राने याची माहिती वन खात्याला दिली होती. दरम्यान वन खात्याने बंदोबस्त करण्यापूर्वीच वाघाने कामगाराचा बळी घेतला.
भोजराज यांची सायकल रस्त्यावर पडून होती, 13 नंबर गेट वरील घटना आहे. कर्मचारी हा CTPS मधील कुणाल एंटरप्राइजेस या कंपनी मध्ये काम करणारा होता. वन विभाग व वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. काही दिवसा पूर्वी वीज केंद्रातून एका पाच वर्षीय मुलीला वाघाने उचलून नेल्याची घटना घडली होते. या हल्ल्याने वीज केंद्रातील वन्यजीव वावराचा प्रश्न गंभीर झाला आहे.