चंद्रपूर ( Chandrapur News ) : रशिया-यूक्रेन यूध्द सूरू झाले असून अनेक भारतीय नागरिक आणि विध्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत.यूक्रेन मध्ये अडकलेल्या विध्यार्थ्यात चंद्रपूरातील सहा विध्यार्थी आहेत.या सहा विध्यार्थ्याचा नातेवाईकांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. अडकलेले सहा विध्यार्थी सूखरूप असल्याची माहीती आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विध्यार्थी यूक्रेन मध्ये अडकल्याची माहीती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळविली आहे.अडकलेल्या विध्यार्थ्यात हर्षल बलवंत टवरे ,ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे ,नेहा शेख, आदिती अनंत सायरे,धीरज असिम बिस्वास,दिक्षराज अकेला या विध्यार्थ्यांचा समावेश आहे.
हे सर्व विध्यार्थी चंद्रपूर शहरातील आहे. अडकलेले सहा विध्यार्थी सूखरूप असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. भारतातील 1 हजार 200 हून अधिक विध्यार्थी शिक्षणासाठी यूक्रेनला गेले आहेत.त्यामुळे भारत सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील जिल्हा प्रशासनाला विध्यार्थ्यांची माहीती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या सगळ्यांचा अहवाल तात्काळ राज्य शासनाकडे देण्यात आला आहे.