एकीला केलं गर्भवती तर दुसरीसोबत केलं लग्न
वर्धा - लग्नबंधनात अडकून काही तासच उलटले होते...गावात 'रिसेप्शन' होणार असल्याने मंडप टाकण्यात आला होता...रोषणाई केली होती...नवरी नवरदेवाची वाट पाहत ताटकळत होती....पण, नवरदेव काही दिसेना...तेवढ्यात कळले की, नवरदेवाला पोलिसांनी उचलून नेऊन 'लॉकअप'मध्ये टाकले...हा प्रकार वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) गावात रविवारी ६ तारखेला घडला.
हे देखील वाचा:
|यवतमाळ | शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; वॉर्डनने दुर्लक्ष केल्याचा आरोप
प्राप्त माहितीनुसार, आरोपी प्रशांत रमेश खैरे याने पीडित युवतीला नागपूर जिल्ह्यातील कवठा गावात त्याच्या ओळखीतील एकाच्या शेतात मालवाहू वाहनातून नेले. तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार २७ मे २०२१ पासून ते जून महिन्यापर्यंत सतत सुरू होता. पीडितेला दिवस गेल्याने ती गर्भवती राहिली. पीडितेने प्रशांतला लग्नाची गळ घातली, पण लग्न करण्यास नकार देत त्याने पीडितेला माहिती होऊ न देता दुसऱ्या युवतीशी विवाह उरकवला. ही गोष्ट ऐकून पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली अन् तिने याबाबतची तक्रार थेट सिंदी पोलिसांत दिली. पोलिसांनी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी होणाऱ्या रिसेप्शन मंडपाबाहेरून प्रशांतला ताब्यात घेत अटक केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नलावडे, कोहळे, अनिल भोवरे, अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, कपिल मेश्राम यांनी केली.
पीडितेचा करणार होता गर्भपात
आरोपी प्रशांतला पीडिता गर्भवती असल्याचे कळताच त्याने तिला विश्वासात घेत गर्भपात करण्याचा सल्ला दिला. गर्भपाताच्या गोळ्या आणून देतो असे सांगून ही बाब कुणालाही न सांगण्यास सांगितले. मात्र, विश्वासघात करून प्रशांतने गुपचूप विवाह उरकवून घेतल्याने पीडितेने तक्रार नोंदविली.
अन् नवरदेव काही दिसेना...
आरोपी प्रशांतचा विवाह ५ फेब्रुवारीला संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी ६ रोजी गावात रिसेप्शन होणार होते. मात्र, पोलिसांनी रिसेप्शन मंडपाबाहेरूनच सापळा रचून नवरदेवाला ताब्यात घेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेलू ठाण्यात नेल्याने खळबळ उडाली.