अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून गुजरात मध्ये एक लाखात विकले
नागपूर : नागपूर येथील एमआयडीसी( MIDC) भागात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनीची चक्क एक लाख रुपयांत गुजरात (Gujarat ) येथे विकले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, पोलिसांनी या प्रकरणात गुजरातच्या (Gujarat ) दोन युवकांसह एक महिला अशी तिघांना अटक केली आहे.
हे देखील वाचा:
|गडचिरोली | धक्कादायक! मुलाने केला वडीलांचा कुऱ्हाडीने निर्घृण खून
पीडित मुलगी ही १६ वर्षीय असून ती विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. तिचे आईवडील एमआयडीसीतील (MIDC) एका कंपनीत कामाला आहेत. तर, विशाखा ही पीडित विद्यार्थिनीच्या मैत्रिणीला ओळखत होती. डिसेंबर महिन्यात विशाखा तिला भेटली. विशाखाने (Vishakha) तिला गुजरातमध्ये (Gujarat ) कापडाच्या दुकानात नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. तर, ती तिला घेऊन गुजरातला गेली असता तिने तिला निखिलच्या माध्यमातून एक लाख रुपयांमध्ये प्रकाशला विकले. तर, प्रकाशने मुलीशी लग्न केले.
तर, नागपुरात मुलगी बेपत्ता झाल्याने कुटूंबियांनी एमआयडीसी (MIDC) पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर, महिला साहाय्यक पोलिस निरीक्षक शारदा भोपाळे, हेडकॉन्स्टेबल ओमप्रकाश, राजेश, विजय, रवींद्र जाधव व सचिन यांनी मुलीचा शोध सुरू केला. तर, तपासात मुलगी विशाखाला भेटल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी विशाखाला अटक केली. नंतर, तिला घेऊन पोलिस गुजरातला (Gujarat) गेले. मुलीची सुटका करून अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
विशाखा (vishakha) प्रदीप बिस्वास (वय ३५, रा. एमआयडीसी), निखिल गिरीशभाई पटेल (वय ३५, रा. मोठी चिचोली, अरवली गुजरात (Gujarat ) व प्रकाश मेघाभाई वनकर (वय ३० रा. मेघरज, जि. अरवली), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विशाखा (vishakha) ही या टोळीची मुख्य सूत्रधार आहे. तिने मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्याचे प्रकाशला सांगितले होते. तर, तिने मुलीचे बनावट दस्तऐवज तयार केल्याची शक्यता आहे. विशाखाने आणखी कोणाची अशा प्रकारे विक्री केली याचा तपास पोलिस करीत आहेत.