२१ वर्षीय मामीकडून १६ वर्षांच्या भाच्याचे लैंगिक शोषण |
नागपूर : नागपुरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लैंगिक संबंधांची पातळी कुठल्याही मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकते, हे या उदाहरणावरून सिद्ध करण्यात आले आहे. सर्व नात्यांना अग्निकुंडात स्वाहा करून नात्याने मामी लागणाऱ्या तरुणीने अल्पवयीन भाच्यासोबतच (16 Year Minor Boy) नको ते प्रकार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मामीनेच आपल्या भाच्याचे लैंगिक शोषण केल्याने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी (Nagpur Crime News) येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर, महत्वाची बाबा अशी, आरोपी मामीचे वय हे अवघे २१ वर्ष आहे. तर, पीडित भाचा हा अल्पवयीन असून तो केवळ १६ वर्षांचा आहे. या प्रकरणी आरोपी मामीच्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामीने केलेल्या या लैंगिक छळाचा व्हिडीओ चित्रीत (Sexual harassment video) केला असल्याचा दावाही केला आहे.
देत होती लैंगिक छळाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी:
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात हा प्रकार उघडकीस आला. मामीच्या या कृत्यामुळे मामी-भाच्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्या गेली आहे. ही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी मामी देऊन लैंगिक शोषण करत असल्याचे बोलले जात आहे. मामीने भाच्याच्या लैंगिक छळ करतानाचे दृश्य कॅमेरा मध्ये कैद केले. त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मामी लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.