आई आपल्या मुलांच्या भल्यासाठी स्वतःचा त्याग करायला मागेपुढे पाहत नाही, पण एखादी आईच आपल्या मुलीच्या इज्जतीची शत्रू झाली तर? यावर विश्वास ठेवणे खूपच कठीण आहे, पण केरळमध्ये असाच एक धक्कादायक एक प्रकार समोर आल आहे. याठिकाणी एका आईने आपल्याच मुलीला बलात्कार करावयाला लावलं. तेही एकदा नाही तर अनेक वेळा.
या प्रकरणी दोषी आढळलेल्या 50 वर्षीय महिलेला न्यायालयाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने बलात्कार करणाऱ्यांनाहि शिक्षा सुनावली आहे. मुवट्टुपुझा येथील कायनाडू मूळच्या महिलेने तिच्या 16 वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
हे देखील वाचा:
न्यायालयाने या प्रकरणी महिला आणि तिचा 36 वर्षीय मित्र अरुण कुमार यांना दोषी ठरवले आहे. महिलेला 10 वर्षे सश्रम कारावास आणि अरुण कुमारला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, मार्च 2017 ते ऑगस्ट 2017 या काळात मुलीवर अनेक वेळा बलात्कार झाला. कुमार मुलीला अनेकवेळा इडुक्की येथील पल्लीवसल येथे घेऊन गेला, तेथे तिच्यावर अनेकवेळा बलात्कार झाला.
नातेवाइकांच्या हातून सुद्धा तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आलेल्या 18 वर्षीय किशोरीला भूतकाळात घरात लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने ही बाब अखेर समोर आली.