वेड्या प्रियकराने मुलीचा गळा चिरून खून केला, मग |
एकतर्फी प्रेमात लोक इतके वेडे होतात की जीव द्यायला तयार होतात. पण उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एकतर्फी प्रेमाचे एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. एकतर्फी प्रेमात वेड्या प्रियकराने खुलेआम मुलीचा गळा चिरून खून केला आणि हत्येनंतर त्याने पोलिस ठाण्यात स्वतःच आत्मसमर्पण केले. आरोपीला मृत तरुणीसोबत लग्न करायचे होते, असे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा:
खरं तर, प्रकरण बागपतच्या झंकार भागातील आहे, जिथे गुरुवारी एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या प्रियकराने बीएच्या ( BA Student ) विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या केली.
तरुणीचा नाव दीपा असं आहे. बाजारातून सामान खरेदी करून घरी परत असताना रिंकू नावाच्या तरुणाने तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि नंतर तिचा गळा चिरून खून केला. ही घटना घडल्यानंतर आरोपी तरुण कोतवाली येथे पोहचला त्यानंतर त्याने खुनात वापरलेला चाकू पोलिसांच्या ताब्यात दिला. आरोपी हा देखील झंकार गल्लीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला मृतक मुलीशी लग्न करायचे होते आणि त्यासाठी त्याने मुलीच्या वडिलांना सुद्धा धमकावले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले, त्यानंतर तिला आनन-फानन सीएचसीमध्ये नेण्यात आले, जिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.