मुलाने केला वडीलांचा कुऱ्हाडीने निर्घृण खून
गडचिरोली (Gadchiroli ) | - शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या विसापूर टोली ( Visapur Toli ) या गावात एका मुलाने आपल्या वडिलांचा खून ( Son Brutally Murdered His Father With an Ax ) केल्याची घटना गुरुवार (ता. ३) सकाळी १०. ३० वाजताच्या दरम्यान घडली. मृत वडिलांचे नाव दामोदर तांगडे (वय ५५) असून, खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव तेजस दामोदर तांगडे (वय २३) दोघेही रा. विसापूर, असे आहे.
हे देखील वाचा:
मृत दामोदर तांगडे यांना दोन मुले असून त्यांचा मोठा मुलगा पोलिस विभागाच्या सी ६० या पथकात कार्यरत आहे. लहान मुलगा आरोपी तेजस तांगडे हा सुशिक्षित बेरोजगार होता. त्याचे वडिलांसोबत गुरुवारी कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात त्याने कु-हाडीने त्यांचा खून ( Son Brutally Murdered His Father With an Ax ) केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
त्यानंतर आरोपी तेजसच्या मोबाईल लोकेशनची माहिती कळताच नियोजनबद्ध तपास लावून त्याला अवघ्या दोन तासांत गडचिरोली शहरातील एसटी डेपोच्या परिसरातून अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून शुक्रवार (ता. ४) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा तपास गडचिरोली शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण करत आहेत.