खुलेआम तलवारी घेऊन फिरणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी केली अटक |
चंद्रपूर:- तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोघांना माजरी पोलीसांनी अटक केली आहे. याबिब सिद्दीकी, अनूप खंडारे असे आरोपींची नावे आहेत. या दोघांवर या पुर्वीही माजरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असल्याची माहीती आहे.
हे देखील वाचा:
|गडचिरोली | कौतुकास्पद! माहिती मिळताच अवघ्या एका तासात थांबवीला बालविवाह #GadchiroliPolice
माजरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माजरी आवारात तलवारी घेऊन फिरत असलेल्या दोन्ही आरोपींना माजरी पोलिसांनी गजाआड केले आहे. याकीब सिद्दीकी आणि अनूप खंडारे अशी आरोपींची नावे असून दोघेही माजरी येथील रहिवासी आहेत. हातात तलवार घेऊन फिरल्यानंतरच गुप्त माहिती मिळाली.
पोलिसांनी लोखंडी तलवार जप्त केली आहे. या दोन्ही आरोपींवर माजरी पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.