चंद्रपूरने आपला सुपुत्र गमावला! | Chandrapur lost his son!
सावली ( Sawali News) :- सावली तालुक्यातील सादागड येथील आशिष जनार्दन मंगाम वय 27 वर्ष हा युवक 2014 ला आर्मी मध्ये भरती झालेला होता. याला पोटात दुखत असल्याची माहिती आर्मी विभागाकडून काल सायंकाळी त्यांच्या परिवाराला देण्यात आली. त्यानंतर आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा त्यांच्या परिवाराला देण्यात आलेली आहे सदर युवा सैनिक हा अविवाहित असून त्याच्या पाठीमागे भाऊ, आई-वडील असा बराच आप्तपरिवार आहे. ( Chandrapur lost his son )
अतिशय होतकरू व खेळाडू असलेला हा युवक 2014 मध्ये आर्मी मध्ये भरती झालेला होता आणि तो त्या ठिकाणी स्पोर्ट साठी प्रसिद्ध होता. दिल्लीला आर्मी मध्ये काम करत असतानाच तो स्पोर्ट साठी मेरठ येथे आलेला होता आणि त्याच्या पोट दुखीचा त्रास वाढल्यामुळे त्यांना तेथील रुग्णालयामध्ये भरती करण्यात आल्याची माहिती त्या विभागाने त्यांच्या परिवाराला दिली आहे.
सदर सैनिकाचे प्रेत आज सावली तालुक्यातील सादागड कडे त्यांच्या घरी आणण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या परिवाराला सैनिक कडून देण्यात आलेली आहे.
सदर घटनेची माहिती सावली पंचायत समिती चे सभापती विजय कोरेवार यांना गावकऱ्यांनी दिली असून युवा खेडाळू व चांगला सैनिक गमावल्याची दुःख सभापती विजय कोरेवार यांनी व्यक्त केली आहे.
सैनिकांच्या मृत्यूमुळे सावली सदर घटनेची माहिती सावली पंचायत समिती चे सभापती विजय कोरेवार यांना गावकऱ्यांनी दिली असून युवा खेडाळू व चांगला सैनिक गमावल्याची दुःख सभापती विजय कोरेवार यांनी व्यक्त केली आहे. सैनिकांच्या मृत्यूमुळे सावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शोककळा पसरली आहे.