Chandrapur Covid Death Updates: चंद्रपूरात आज कोरोनामुळे 2 मृत्यु |
Chandrapur Covid Death Updates: जिल्ह्यात गत 24 तासात जिल्ह्यात 37 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 28 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर गुरुवारी जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. ( Chandrapur Covid Cases Today )
हे देखील वाचा:
|चंद्रपूर : वीज केंद्र परीसरातून वाघाने कामगाराला उचलून नेले
Chandrapur Covid Cases: आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 2, चंद्रपूर 1, बल्लारपूर 1, ब्रह्मपुरी 3, नागभीड 2, मुल 1, गोंडपिपरी 1, चिमूर 15, तर वरोरा येथे 2 रुग्ण आढळून आले असून भद्रावती, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, राजुरा, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्या मध्ये ब्रम्हपूरी तालुक्यातील एका पुरुषाचा तर राजूरा तालुक्यातील एका महिलेचा समावेश आहे.