भरधाव दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार, एक गंभीर जखमी
पोंभूर्णा ( Pombhurna Accident ) | चेक पोंभूर्णा येथील सर्कल पाॅईंट वळणावर भरधाव दुचाकीवरून (Bhardhaw two-wheeler accident ) नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चांदली ( बु.) येथील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. १४ फेब्रुवारी दुपारी दोन वाजता च्या सुमारास घडली. मृतक प्रशांत जागोबा गुरूनूले वय ३९ वर्ष तर धनराज गुरनूले वय ४२ वर्ष असे गंभीर जखमीचे नाव आहे. ( One killed, one seriously injured in Bhardhaw two-wheeler accident )
मूल तालुक्यातील सुशी येथे चुलत भावाच्या लग्नासाठी आलेले दोघे चुलत भाऊ पोंभूर्णा येथे व्यक्तीगत कामासाठी आले होते. परत सुशी गावाकडे जात असताना चेक पोंभूर्णा नजीक शासकीय गोडावून जवळील सर्कल पाॅईंटच्या वळणावर भरधाव असलेल्या दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी पोलला जावून आदळली यात प्रशांत गुरनुले हा जागीच ठार झाला. तर धनराज गुरनूले हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.मात्र गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ चंद्रपूरला हलविण्यात आले. सदर घटनेचा तपास पोंभूर्णा पोलिस करीत आहे.