बेसमेंटची जाळी कोसळून पाचजण ठार |
Pune: पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ इमारतीची स्लॅबची जाळी कोसळून दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर या दुर्घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली. (Big Accident in Pune)
या घटनेबाबत राहुल श्रीरामे यांनी दिलेल्या माहितीनुसार,वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास सुरू होते.
हे देखील वाचा:
त्या दरम्यान बेसमेंटची जाळी कोसळून, त्यामध्ये 10 जण गंभीर जखमी झाले. त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य पाच जणांवर उपचार सुरू आहेत. ही कामगार कुठले आहेत आणि नेमके किती कामगार कामावर होते.याबाबत अधिक तपास सुरू आहे.तर अग्निशमन दलाच्या सहाय्याने मदत कार्य पार पडले असल्याचे त्यांनी सांगितले.