- चंद्रपूर शहरातील बगड खिडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चंद्रपूर | महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा महानगर चंद्रपूर सचिव प्रवीण उरकुडे यांच्या पुढाकाराने प्रजासत्ताक दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात ध्वजारोहण करून श्रमिक कार्डची नोंदणी केलेल्या नागरीकांना श्रमिक कार्डचे वितरण करण्यात आले कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की युवकांनी देशसेवा करण्यासाठी सदैव तत्पर रहावे व सामाजिक उपक्रमात पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धे मध्ये सहभागी झालेल्या शाळकरी मुलांना प्रमाणपत्र देऊन बक्षिषांचे वितरण करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर महामंत्री ब्रिजभुषण पाझारे यांनी युवकांना मार्गदर्शन केले यावेळी सदर कार्यक्रमात गौतम नगराळे,युवा मोर्चा उपाध्यक्ष यश बांगडे,अखिलेश रोहिदास यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साजिद पठाण,राहुल नगराळे, विकी मेश्राम,अमन वाघ, शुभम खेडकर,गौरव कुशमवार,तेजस काकडे,सागर निरगुडवार,अजय खुजे,अक्षय कुंभारे यांनी अथक परिश्रम घेतले