उस्मानाबाद ( Osmanabad ) : उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांमधील इयत्ता १० वी व १२ वी चे वर्ग कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अटीवर टप्याटप्याने पुन्हा सुरु करण्याचे अनुषंगाने आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. ( Osmanabad School Reopened Phases From 31 Jan )
जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांमधील इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी चे वर्ग कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अटीवर दि.३१/०१/२०२२ पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
त्यामुळे इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याच्या अटीवर दि.३१/०१/२०२२ पासून पूर्ण वेळ नियमितपणे सुरु राहतील. उर्वरित इयत्ता १ ली ते ८ वी चे वर्ग दि. ०५/०२/२०२२ पर्यंत बंद राहतील.