चंद्रपूर ( Chandrapur ): राष्ट्रीय हरित लवादाकडून (national green tribunal) चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राला 5 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आलाय. वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने NGT ने हा आदेश दिला. चंद्रपूर MIDC चे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राविरुद्ध ही याचिका दाखल केली होती. विज केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश देखील NGT ने दिले आहेत.
Read Also: CoronaVirus In Pune: पुणे में बढ़ी मरीजों की संख्या, पिछले 24 घंटों में 8,301 नए मरीज और 4 मरीजों की मौत
या समितीत पर्यावरण मंत्रालयाच्या क्षेत्रीय समितीचे सदस्य, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य यांना समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.