गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांना नक्षल्यांचा विरोध स्पष्टपणे पुढे आला आहे. रस्ते बांधकामावर असलेली 11 वाहने नक्षलवाद्यांनी जाळली आहेत. यात 9 ट्रॅक्टर, 2 जेसीबीचा समावेश आहे.
भामरागड तालुक्यातील इरपनार गावाजवळ दुपारी ही घटना घडली. या भागातील धोडराज- इरपनार- नेलगुंडा गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू होते. या कामावर यंत्रसामुग्री कार्यरत असताना नक्षल्यांनी काम थांबवून वाहने जाळली. अतिदुर्गम भागात विकासकामांना नक्षल्यांचा विरोध जारीच आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत नक्षल शोधमोहीम वेगवान केली आहे. जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूक आणि मतमोजणी पूर्ण होऊन 24 तास होत नाही तोच नक्षली सक्रिय झाल्याचे चित्र आहे.