आपली बदनामी झाली. या भावनेने ग्रासून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले
नागपूर ( Nagpur News): तरुणावस्थेत प्रेम कधी आणि कसे होईल याचा नेम नाही. अशाच प्रेमाच्या पोटी त्या दोघांनी आपला जीव गमावल्याची घटना नागपुरात घडली आहे. सूरज आणि रसिका अशी दोघांची नवे असून आपल्या प्रेम प्रकरणाबद्दल साऱ्या गावाला माहिती मिळाली. आपली बदनामी झाली. या भावनेने ग्रासून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. याचदरम्यान, रसिका घरातून बेपत्ता असल्यामुळे तिचे मामा चिंतेत पडले. त्यांनी रसिकाचा शोध घेतला. पण, ती कुठेही सापडली नाही. अखेर मामाने जलालखेडा येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करण्यात सुरुवात केला असता तिने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सूरज वगारे हा अठरा वर्षीय युवक. नरखेड (Narkhed) तालुक्यातील महेंद्री येथील रहिवासी होता. तर, रसिया गायकवाड ही सोळा वर्षीय युवती. तिच्या मामाकडे शिक्षणासाठी नायगाव येथे राहत होती. सूरज आणि रसिकाची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांच्या या प्रेमाबद्दल संपूर्ण गावात चर्चा होती. दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. जलालखेडा येथे शुक्रवारी दोघेही पळून गेले. तिथून ते मोवाडला गेले. मोवाडपासून दीड किमी अंतरावर गोधनी फाट्याजवळ दिलीप बोडके यांचे शेत आहे. ते तेथे पोहोचले आणि तेथेच दोघांनीही विषारी औषध प्राशन केले.
तसेच, त्यांचा लग्न करण्याचा विचार होता. पण, लग्नासाठी आवश्यक असलेले वय त्यांच्याकडे नव्हते. कारण, ती फक्त सोळा वर्षांची, तर तो अठरा वर्षांचा होता. आता यावर उपाय काय करायचा गावात आपल्या बद्दलच्या चर्चेला उधाण आलेले पाहून दोघेही नैराश्येने ग्रासले. आणि त्यांनी असे पाऊल उचलले. उमरी येथील रस्त्याने एक तरुण जात असतांना त्यांना सूरज आणि रसिका बेशुद्धावस्थेत सापडले. त्याने त्वरित त्या दोघांनाही मोवाडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. शरीरात विष भिनल्याने त्यांच्यावर योग्य उपचार करता आले नाहीत. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूरला येथील रुग्णालयात पाठविले. शनिवारी पहाटे उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या दोघांचेही पालक पूर्णतः खचून गेले आहेत. तर, आपल्या मुलांनी असा निर्णय का घेतला या बाबतीत ते विचाराधीन आहेत.