(ads1)
आरमोरी (Armori ) : एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण केल्यानंतर लग्नाचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण करण्याची घटना आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे घडली. याप्रकरणी पीडित तक्रारीवरून मुलीच्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महेश भगवान गेडाम ( २८ वर्षे ) रा. कोजबी याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुद्धा सन २०१८ पासून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
(ads1)
Read Also:
दरम्यान, आता त्याने यातून अंग काढून घेतले. त्यामुळे पीडित मुलीने ३० डिसेंबरला आरमोरी पोलिसांत रिपोर्ट दिला. त्यावरून पोलिसांनी युवकाविरुद्ध तसेच बलात्कार लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा नोंद केला. तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कांचन उईके करीत आहेत