चंद्रपूर ( Chandrapur ) :- लालपेठ येथील ऐरिया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या (48-year-old woman dies ) 48 वर्षीय पोसूबाई रासूर या महिलेला रेफर करण्यात विलंब झाल्याने सदर महिलेचा मृत्यु झाल्याचा आरोप यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराअध्यक्ष कलाकार मल्लारप यांनी केले असुन या प्रकरणाची चैकशी करुन सबंधित डॉक्टर यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी तसेच मृतकाच्या कुटुंबीयातील एकाला वेकोलीत नौकरी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
हे देखील वाचा:
|आत्महत्या | गडचिरोलीत महिला पोलिस शिपायाची आत्महत्या
वेकोली येथे कार्यरत पोसूबाई रासूर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने 27 जानेवारीला लालपेठ येथील वेकोली च्या ऐरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्याण त्यांची प्रकृती आखणी खालवली यावेळी सदर रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्याची मागणी कुटंबीयांनी केली होती. मात्र या प्रक्रियेतील दिरंगाईमूळे 24 तासाचा कालावधी लोटूनही रुग्णाला रेफर करण्यात आले नाही. यातच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातलगांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप यांनी रुग्णालय परिसर गाठून दोषी डॉक्टरांवर कार्यवाही होत नाही तोवर मृतदेह हलविणार नाही अशी भुमिका घेतली त्यामूळे काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतकाच्या परिवाराला रुग्णालया तर्फे आर्थिक मदत करत मृतकाच्या कुटुंबीयातील एकाला कायमस्वरुपी नौकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामूळे तणाव निवळला.
सदर रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजी पणामूळे येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. त्यामूळे याकडे वरिष्ठ अधिका-र्यांनी लक्ष देत सदर प्रकरणाची चैकशी करुन दोषी आढळल्यास सबंधित डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिग्रेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप यांनी केली आहे.