मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Patients In Maharashtra) झपाट्याने वाढत असताना त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरच कोरोनाच्या विळख्यात (Resident Doctors Of Maharashtra Tested Corona Positive) सापडत आहेत. मुंबईसह राज्यभरात तब्बल ३४६ निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबईतील जे.जे. रुग्णालयात ६४, कूपर ७, केईएम ७०, सायन ९८ व नायर रुग्णालयात ४५ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
(ads1)
मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईत ही संख्या २० हजारावर गेली आहे. यात आता डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे. राज्यातील रुग्णालयांसह मुंबईतील जे. जे. तसेच पालिकेच्या सायन, केईएम, नायर, कूपर, नायर या रुग्णालयात मिळून एकूण २८४ डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मार्डचे डॉ. अविनाश दहिफळे यांनी दिली.
(ads1)
पहिल्या लाटेत राज्यभरातील रुग्णालये मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात सापडली होती. यावेळी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. ऑक्सिजनचा वापरही वाढला होता. या स्थितीत डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यावेळी रुग्णालयावर ताण आला होता. यावेळी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात नोंद होत असली तरी प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. अनेक रुग्णालयात खाटा रिकाम्या आहेत. त्यामुळे रुग्ण वाढत असले तरी रुग्णालयात दाखल होणा-यांची रुग्णांची संख्या कमी असल्याने सध्या तरी दिलासा मिळाला आहे. दरम्यान रुग्णालयातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जाते आहे.