सातारा: दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या ( School-Girl-Rape-And-Murder ) केल्याची धक्कादायक घटना काल रात्री सातारा ढेबेवाडी विभागातील एका गावात घडली आहे. हत्येनंतर मुलीचा मृतदेह गावाशेजारील डोंगरातील दरीत आढळून आला. बलात्कार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी गावातीलच एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चंद्रु थोरात असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बाहेर खेळायला गेलेली मुलगी परतली नाही म्हणून शोधाशोध सुरु केली. ( school-girl-rape-and-murder-at-dhebewadi )
(ads1)
Read Also: नागपूर : ३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर नागपुरात अखेर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
संबंधित सात वर्षीय बालिका दुसरीच्या वर्गात शिकत होती. काल दुपारी साडे तीनच्या सुमारास ती बाहेर खेळायला गेली मात्र उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर घरच्यांनी शोधाशोध सुरु केली.
मात्र सर्वत्र शोधूनही ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रभर आजूबाजूच्या परिसरात कसून तपास केला. पोलिसांना एकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता घटना उघड चौकशी करत असताना पोलिसांना एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता पहाटे या प्रकरणाचा उलगडा झाला. संतोष चंद्रु थोरात असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्या मुलीच्या मृतदेहापर्यंत पोहचले. गावापासून लांब मृतदेह दरीत सापडला.
Read Also: अमरावती : विजेच्या धक्क्याने चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
(ads1)
शंभूराजे देसाईंनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट:
घटनास्थळी व पिडीतीच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांसह भेट दिली. घटनेची माहिती घेत तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या. ही केस जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल असा तपास पोलिसांकडून केला जाईल अशी माहिती शंभुराजे देसाई यांनी दिली.