चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाने हिवाळी-२०२१ हि परीक्षा जानेवारी महिन्यापासून ऑफलाइन पध्दतीने होईल असे विद्यापीठाने जाहिर केले आहे. विद्यापीठातुन सर्व विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांचा या निर्णयाला विरोध आहे. कारण कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शिक्षण प्रणाली अनेक दिवसांपासून आभासी पध्दतीने सुरु आहे.
Read Also: चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करावे :- श्याम बोबडे
बसेस चा संप मागे न घेतल्याने बस सेवा सुरू झालेले नाही, ओमिक्रान (Omicron) सारखा भयंकर विषाणू वेगाने वाढत चालला आहे, बाहेर गावचे विद्यार्थी महाविद्यालयात कशाने प्रवास करून येतील? खाजगी वाहनाने प्रवास करणे विद्यार्थ्यांना परवडण्यासारखे नाही, अभ्यासक्रम (Syllabus) अपूर्ण असल्यामुळे कोणतेही नोट्स (Notes) विद्यार्थी वर्गाला मिळाले नाही, परीक्षा कशा द्यावा? ऑफलाइन (Offline) परीक्षेत Covid आणि Omicron यांचा प्रादुर्भाव वाढल्यात जिम्मेदार कोण? प्रवासा दरम्यान कोणाला उशीर झाला त्यास जिम्मेदार कोण? असे अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात निर्माण होत आहे.
त्यामुळे हिवाळी-२०२१ परीक्षा हि ऑनलाइन पध्दतीनेच घेण्यात यावी या मागणी सहित संपुर्ण विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग यांच्या वतीने यंग थिंकर्स चंद्रपुरच्या चमु तर्फे दिनांक २८ डिसेंबरला मा. कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने श्याम बोबडे, शुभम निंबाळकर, आकाश वानखेडे, राजेश हजारे व इतर विद्यार्थी उपस्थित होते.