चंद्रपूर / गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठाने आज वृत्तपत्रं द्वारे जाहीर केले की हिवाळी परीक्षा ही ऑफलाइन MCQ (Offline MCQ) ( Gondwana Winter Exam Offline ) पद्धती नुसार होणार असून १ लाख ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहे. परंतु अद्याप ही कोणत्याही महाविद्यायातर्फे परिपूर्ण अभ्यासक्रम (Syllabus) पूर्ण झालेला नाही, सोबतच ज्या पद्धतीने ऑफलाइन वर्ग (Offline classes) सुरू आहेत. त्यात १००% विद्यार्थी उपस्थित नाही. विद्यापीठाने कोणत्या विद्यार्थी वर्गाचा विचार न करता मनमर्जीने कारभार सुरू केला आहे. .( Gondwana Winter Exam Offline Session-2021-22 )
(ads1)
बसेस चा संप मागे न घेतल्याने बस सेवा सुरू झालेल्या नाहीत, ओमिक्रान (Omicron) सारखा भयंकर विषाणू वेगाने वाढत चालला आहे, बाहेर गावचे विद्यार्थी महाविद्यालयात कशाने प्रवास करून येतील? खाजगी वाहनाने प्रवास करणे विद्यार्थ्यांना परवडण्यासारखे नाही,
(ads1)
अभ्यासक्रम (Syllabus) अपूर्ण असल्यामुळे कोणतेही नोट्स (Notes) विद्यार्थी वर्गाला मिळाले नाही, परीक्षा कशा द्यावा? ऑफलाइन (Offline) परीक्षेत Covid आणि Omicron यांचा प्रादुर्भाव वाढल्यात जिम्मेदार कोण? प्रवासा दरम्यान कोणाला उशीर झाला त्यास जिम्मेदार कोण? विद्यार्थ्यांना त्रास देण्याची परंपरा गोंडवाना विद्यापीठ निभावत आहे का?
असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. गोंडवाना विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा विचार करून हिवाळी परीक्षा ही ऑनलाईन (Online) घेण्यात यावी अशी मागणी श्याम बोबडे भाजयुमो महानगर चंद्रपूर यांनी केली आहे.