नागपूर (Nagpur) : मोबाइल बघण्यावरून मुलींसोबत झालेल्या वादातून ३६ वर्षीय आईने विष प्राशन करीत आत्महत्या ( Nagpur Suicide ) केली. काटोल पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मेंढेपठार येथे ही घटना उघडकीस आली. सुनीता नरेश बांगडे असे मृतकाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सुनीता यांच्या मुली मोबाइल बघत होत्या. त्यांनी मुलींना हटकले. यावरून त्यांचा मुलींसोबत वाद झाला.
(ads1)
वाद विकोपाला गेला. सुनीता घराबाहेर आल्या. त्यांनी विष घेतले. प्रकृती खालावल्याने नातेवाइकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सुनीता यांना मृत घोषित केले. काटोल पोलिसांनी ( Suicide ) आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.