नागपूर (Nagpur) : लग्नानंतर मूलबाळ व्हावं, असं प्रत्येक दाम्पत्याचं स्वप्न असतं. पण आई बनणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. पण नागपुरातील एका दाम्पत्यासोबत विचित्र घटना घडली आहे. येथील एका दाम्पत्याला लग्न झाल्यानंतर तब्बल 17 वर्षे मूलबाळ झालं नाही. अनेक प्रकारचे उपचार घेऊनही पदरी निराशा आली. पण लग्नाच्या सतरा वर्षानंतर त्यांना सरप्राइज मिळालं आहे.Nagpur News: 9 महिन्यांपासून पोटात वाढत होतं बाळ अन् महिलेला नव्हता थांगपत्ता
गर्भधारणा होऊन नऊ महिने झाल्यानंतरही महिलेला आपण गर्भवती असल्याचा थांगपत्ता नव्हता. पण पोटात दुखू लागल्यानंतर त्या रुग्णालयात दाखल झाल्या, त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
गर्भधारणा होऊन नऊ महिने झाल्याची माहिती डॉक्टरांकडून दिल्यानंतर, संबंधित दाम्पत्याला विश्वासच बसला नाही. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना पुन्हा एकदा तपासणी करण्यास सांगितलं. दुसऱ्या तपासणीतही संबंधित महिला गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. या विचित्र प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. यानंतर संबंधित महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. संबंधित घटना नागपुरातील एम्स रुग्णालयात घडली आहे.
हे नक्कीच वाचा: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन युवकांना अज्ञात वाहनाने चिरडलेले
गर्भधारणा होऊन नऊ महिन्यानंतरही पोटात बाळ वाढत असल्याची माहिती महिलेला नव्हती, हे पाहून रुग्णालयात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे संबंधित 47 वर्षीय महिलेला दीर्घकालीन उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. याच्या गोळ्याही सुरू होत्या. अशा गोळ्या पोटातील बाळासाठी हानिकारक असतात. पण या घटनेत मात्र तसं काहीच झालं नाही. निरोगी बाळ जन्माला आल्याने डॉक्टर देखील हैराण झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एम्समधील डॉक्टरांच्या टीम वर्कमुळे संबंधित महिलेची यशस्वी प्रसूती झाली आहे. संबंधित महिलेवर यापूर्वी ओपन हार्ट आणि स्पाइनची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याशिवाय दीर्घकालीनं उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास देखील त्यांना होता. अशा स्थितीत प्रसूती करणं त्यांच्या जीवाला धोका होता. पण त्यांच्या मनक्यात भूलीचं इंजेक्शन देत ही प्रसूती करण्यात आली आहे.