नागभीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू |
नागभीड: नागभीड पोलिस स्टेशन अंतर्गत किरमिटी मेंढा येथील महामार्गावर अज्ञात वाहणाच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाला. विजय रामकृष्ण भुते ( वय - ५० रा. तोरगांव बुज. ता. ब्रम्हपुरी ) असे मृतकाचे नाव असून तो स्वतःच्या दुचाकी गडचिरोली वरून स्वगावी येत असताना वाटेतच किरमिटी मेंढा ता. नागभीड येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहन त्याला धडक देऊन फरार झाला. यात विजय गंभीर जखमी झाला त्याला नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
हे नक्कीच वाचा: औषध घेऊन घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
परंतु विजयची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला ब्रम्हपुरी ला हलविण्यात आले. परंतु प्रवास दरम्यान विजयचा मृत्यू झाला. याची माहिती नागभीड पोलिसांना मिळताच घटना स्थळ गाठून अज्ञात वाहणावर गुन्हा दाखल केला. मृतकाला पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार असून पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.