चंद्रपूर - तीन मुलांना सोडून आईचं प्रियकरासोबत फरार |
चंद्रपूर (Chandrapur) : पतीच्या किंवा सासरच्या मंडळींकडून एखाद्या महिलेवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना आपल्याला सर्रास वाचायला मिळत असतात. चंद्रपूरमध्ये मात्र पत्नीने आपल्या पतीचा आणि सासूचा छळ केल्याची कैफियत पतीने पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे. आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली असून ती माझ्या आईवडिलांनाही मारहाण करत असे. तसेच ती त्यांना जेवणही देत नसे, अशी तक्रार पतीने केली आहे. माझ्यासारख्या पीडित पुरुषांना न्याय मिळवून देण्यासाठी महिलांसाठी आहे तशा प्रकारचा कायदाच अस्तित्वाच नसून तसा कायदा असावा अशी मागणी पतीने पत्रकार परिषदेत केली आहे.
हे नक्कीच वाचा: नागपूर १०वी च्या विद्यार्थिनीशी स्कूल व्हॅलचालकाची सलगी, आईला सापडला नको त्या अवस्थेत आणि…
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथील रहिवासी वामन मेश्राम यांनी पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता. त्यांची पत्नी निकिती या नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील आहेत. या दांपत्याला तीन मुलं आहेत. त्यांचा संसार चांगला चालला होता. मात्र, वामन यांनी पत्रकार परिषदेत आपली कैफियत मांडली. आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती देताना ते म्हणाले की, काही वर्षांनी निकिती मला मानसिक त्रास देऊ लागली. तसेच ती मुलांनाही त्रास देऊ लागली. इतकेच नाही तर माझ्या आई-वडिलांना देखील त्रास देऊ लागली. त्यांना मारहाणही करू लागली.
ती माझ्या आई-वडिलांना हुंडाबळी प्रकरणात फसवण्याची धमकीही देऊ लागली. आपण आत्महत्या करू आणि संपूर्ण मेश्राम कुटुंबाला त्यात फसवू अशी धमकीही ती देत असल्याचे वामन मेश्राम यांनी सांगितले. रहाते घर माझ्या नावे कर, माझ्या प्रियकराला घरात येण्यास मज्जाव होता कामा नये, अशा मागण्या ती करू लागली, असेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला मोठा मानसिक त्रास होत असल्याचे वामन यांनी सांगितले.
हे नक्कीच वाचा: मिलिंद तेलतुंबडे (नक्षलवादी ) यांनी जमिनीत गाडून ठेवलेल्या पैशाची नक्षलवादयांकडून शोधाशोध
‘पुरुषांच्या बाजूने कायदा नाही’
अखेर आपल्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपण हे प्रकरण घेऊन गावातील तंटामुक्ती समितीकडे घेऊन गेलो. त्याच बरोबर आपण पोलिसातही याबाबत तक्रार दिली. मात्र, अशा प्रकरणांमध्ये पुरुषांच्या बाजूने कायदा अस्तित्वात नसल्याचे उत्तर आपल्याला पोलिसांनी दिल्याचे वामन मेश्राम यांनी सांगितले.