Chandrapur Accident News: आज सकाळच्याच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी गेलेल्या व्याहड बूज येथील 3 युवकांवरून अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत त्यात दिपक दादोरीया या युवकाला चिरडले असून त्यात तो घटनास्थळीच ठार झाला तर अंकुश सोयाम , अक्षय रामटेके ( व्याहाड बूज.) हे गंभीर जखमी झालेले आहे.
हे नक्कीच वाचा: चिमूर: मजुरीला जाणाऱ्या महिलेवर शेतात नेऊन केला बलात्कार
ही घटना आज सकाळीच घडली असून हे तीन मुल सकाळी चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर फिरायला गेले असता त्यांचे चूनारकर धाबा या जवळ अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांना देण्यात आलेली आहे.