वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार
Chandrapur: दुर्गापूर परिसरातील शेरावाली कोल ट्रॉन्सपोर्ट परिसरासतील मेसच्या बाजुला शौचास गेलेल्या युवकावर धबा दरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना गुरुवारी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. बबलु सिंग रा. झारखंड असे मृतक युवकाचे नाव आहे. ( youth-was-killed-on-the-spot-in-the-tiger-attack )
बराच वेळ झाल्यानंतरही बबलु परत न आल्यामुळे शेरावाली ट्रान्सपोट्र्चे इंचार्ज संजीव शर्मा व कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बबलू चा शोध घेतला. कंपनीच्या १०० मीटर अंतरावर बबलूचे अर्धवट शरीर आढळून आले. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.