राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या |
गोंडपिपरी:- चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत जात आहे. आज गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथिल तरूण वैभव शर्मा याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना आज पहाटेला उघडळीस आली आणि गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( young-man-suicide-hanging-home
या घटनेची संपूर्ण माहीती धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूशिल धोकटे यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस विभागाने तात्काळ घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.
पुढील चौकशी धाबा पोलीस करीत आहेत. वैभवचा पश्चात वडील, आई, बहीण असा परिवार आहे. त्याचा अवेळी जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.