Bhandra Crime News: महिला ग्रा.पं. सदस्याच्या पतीला मारहाण
Bhandra Crime News: घराचे सांडपाणी नालीतून वाहत असल्याचा बादावरून एका इसमाला काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास डोंगरगाव येथे घडली. विशाल मधोराव मानकर (४०) रा.डोंगरगाव असे जखमीचे नाव आहे. राजेंद्र गडबड खराबे, जितेंद्र गडबड खराबे, गडबड सोविंदा खराबे असे आरोपीचे नाव आहे. ( Women's G.P. Member's husband beaten )
घरा समोर डांबरीकरण रस्त्याचे काम जोरात सुरू आहे, मात्र एका कडेला सिमेंट नालीचे बांधकाम ग्रामपंचायतीने केले होते, मात्र एका बाजूने नालीचे बांधकाम करण्यात आले नाही, त्यामुळे फिर्यादीचे घराचे सांडपाणी पाईपाद्वारे घरासमोरील नालीतून वाहत असल्याने नालीच्या पाण्याचा बाद विकोपाला गेल्याने आरोपी यांनी महिला ग्रामपंचायत सदस्या यांच्या नवऱ्याला जबरण शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची घटना घडली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आंधळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा: विवाहित महिलांनी पतीला सोडून धरला प्रियकराचा हात…
याप्रकरणात विशाल मानकर यांच्या फिर्यादीवरून अधिळगाव पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भादवी कलम ३२६ ३२३, ५०६, ३४ नुसार आरोपी राजेंद्र गडबड खराबे, जितेंद्र गडबड खराबे, गडबड़ सोविंदा खराबे सर्व रा. डोंगरगाव अश्या तीनही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आंधळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश पडवार, बिट जमादार विजय मोदनकर, पोलीस सिफाई नवनाथ सिदणे, सिर्धार्थ शेडके करीत आहेत.