नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार |
Nagpur Rape: नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपी ना अटक केली तर तीन संशयित आरोपी चा शोध पोलीस घेत आहे. मात्र या घटने मुळे नागपूर शहरात नेमकं चाललं तरी काय असे प्रश्न उपस्थित होत आहे. ( nagpur-gang-rape-of-a-17-year-old-girl-in-nagpur-four-arrested ) हेही वाचा: शाळा सुरु होताच विद्यार्थ्याला कोरोनाची लागण, शाळा तीन आठवडे बंद
अल्पवयीन मुलगी मित्रासोबत फिरायला गेले असतां अचानक तिथे पोहचलेल्या काही अज्ञात व्यक्तीनी मित्राला मारहाण करून पीडितेवर सामूहिक अत्याचार केला अशी तक्रार पोलिसांकडे आली. पण पोलीस तपास करत असताना मुलीच्या मित्रानेच पैसे घेऊन मुलांना बोलावले असल्याचं उघडकीस आले. या प्रकरणात एकूण सात आरोपी असून यात मुलीच्या मित्रा सह चार जणांना अटक करण्यात आली, असून तिघांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी मुलीची मेडिकल चाचणी करून घेतली असून ती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे..