आलापल्ली आणि वैरागड येथील विवाहित महिलांनी पतीला सोडून धरला प्रियकराच्या हात
आलापल्ली:- प्रतिभा हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी अडपल्ली येथील अरुण मानकर यांच्यासोबत झाला . त्यांना दोन मुले आहेत. यादरम्यान प्रतिभाचे सूत घरामागे राहात असलेल्या दिवाकर खोब्रागडे ( ३४ ) यांच्यासोबत जुळले. ही बाब अरुण यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी पत्नीची कानउघाडणी केली. मात्र , त्यानंतरही ती पतीसोबत राहण्यास इच्छुक नव्हती. त्यामुळे अरुण व तिच्यामध्ये सातत्याने भांडणेहोत होती. ( gadchiroli-news-married-woman-left-her-husband-and-held-the-hand-of-her-lover )
हे सुद्धा वाचा: Nagpur Crime: झोपलेल्या पत्नीच्या अंगावर पतीने फेकले उकळते तेल
१५ दिवसांपूर्वी प्रतिभा व दिवाकर हे दोघेजण पळून जाणार होते. याची कुणकुण पतीला लागल्यानंतर त्यांनी तिला अटकाव केला. दरम्यान दिवाकरचे घर अगदी मागील बाजूस असल्याने दोघांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत होते. २२ ऑक्टोबरच्या रात्री प्रतिभा दिवाकरच्या घरी पळून गेली. ही बाब अरुणला माहीत झाल्यानंतर त्यांनीगावातील पंच बोलविले. त्यांच्यासमोर तिने अरुणसोबत संसार करण्यास स्पष्ट नकार दिला . विशेष म्हणजे दोन मुलांची जबाबदारीही तिने स्वत:कडे घेतली आणि ती प्रियकरासोबत निघून गेली . याबाबत गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर प्रतिभाच्या विरोधात भादंवि कलम ४ ९ ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
वैरागड: चार वर्षांपूर्वी शेजारच्या एका युवकाशी संसार थाटून दोन मुलींना जन्म देणारी ३४ वर्षीय महिला पती आणि मुलांना सोडून एका अविवाहित युवकासोबत पळून गेल्याची घटना येथे चर्चेचा विषय झाली आहे . तिचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे अखेर पतीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. १ ९ दिवस झाले तरी तिचा आणि तिच्यासोबत गेलेल्या गावातील युवकाचा शोध लागलेला नाही . गेल्या १३ ऑक्टोबरला वैरागड येथील ही महिला गायब झाली. चार वर्षापूर्वी सदर महिलेचा विवाह घराशेजारी राहणाऱ्या उद्धव खंडू मानकर यांच्याबरोबर झाला. त्यांना सोनाली ( १ वर्ष ) आणि प्रिया ( ३ वर्ष ) अशा दोन मुली आहेत . दोघांचा सुखाचा संसार सुरू असतानाच त्या महिलेचे मोहल्ल्यातील सुधाकर दुमाने या अविवाहित मुलाशी सूत जुळले.
हे सुद्धा वाचा: ब्रम्हपुरी : वैनगंगेच्या पुलावरून उडी घेऊन युवकांची आत्महत्या.! तब्बल दोन दिवसांनी आढळला मृतदेह
दरम्यान , १३ ऑक्टोबरला सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान दवाखान्यात जाते म्हणून ती घरून निघून गेली , ती परत आलीच नाही. त्याच दिवशी गावातील सुधाकर दुमाने हा युवकही गायब झाला. त्यामुळे त्याच्यासोबतच ती पळून गेल्याची तक्रार पतीने पोलिसात दिली. ज्या व्यक्तीने महिलेची माहिती पतीला देणाऱ्याला 5000 रु बक्षीस देण्यात येईल असे पतीने सांगितले आहे.