राजुरा:- थ्रेशर मशीन वर सोयाबीन काढत असताना अचानक थ्रेशरमध्ये सापडल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज राजुरा तालुक्यातील माथरा शेतशिवरात आज पहाटेला घडली. रामकिसन रामदास धोटे (४०) असे मृतकाचे नाव आहे. ( farmer-dies-after-getting-stuck-in-thresher-machine-while-extracting-soybeans-in-rajura)
सध्या शेतात सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. अलीकडे सोयाबीन काढणीसाठी थ्रेशर मशीनचा वापर केला जातो. रामकिसन रामदास धोटे हा सकाळच्या सुमारास मशीनमध्ये सोयाबीनच्या पेंढ्या टाकत असताना अचानक तो मशीनमध्ये ओढून दबल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहचणार असू पुढील तपास पोलिस करणार आहेत.