विवाहितेची गळफास घेत आत्महत्या |
चिमूर:- चिमूर तालुक्यामधील शंकरपुर येथील वॉर्ड नंबर 3 मधील रहिवासी असलेल्या एका विवाहितेनी आपल्याच राहते घरी गळफास घेत आत्महत्या केली असून ही घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव जाणू बादल मंडल ( वय 22 ) असे आहे. ( chimur-suicide-by-strangling-a-married-woman-in-shankarpur )
नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने घटस्थापना करण्याची तयारी सुरू होती. या महिलेने घरातीलच स्वयंपाक रूममधील पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. घरच्या लोकांना माहिती होताच त्यांनी तिला उतरवून शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी जाणूला मृत घोषित केल्याने शवविच्छेदन करण्यासाठी प्रेत चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आत्महत्येचे कारण अजूनपर्यंत अपस्ट असून चिमूर पोलीस स्टेशन मध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.