बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू |
भंडारा: शहरालगतच्या भोजापूर जवळील बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सहा वर्षिय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना दि. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजतादरम्यान घडली. यश दिनेश उईके रा.व्हिआयवी नगर, भोजापूर असे दुर्दैवी मृत बालकाचे नाव आहे. (child-dies-drowned-in-dam )
हि पण बातमी वाचा: Crime News | ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पहिल्या वर्गात शिकणारा यश उईके हा काल आपल्या दोन तीन मित्रांसोबत पोहण्यासाठी भोजापूर जवळील पाणी अडविले कल्या बंधायावर गेले होते. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेला. पाण्यात गटांगल्या खाबू लागला. व त्यातच त्याचा पाण्यात बुडून करून अंत झाला. माहिती मिळताच मंडारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा वेला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविले. यश याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पो. उपनिरीक्षक कराडे करीत आहेत.