Chandrapur News: कामानिमित्त निघालेल्या नांदगाव घोसरी येथील 32 वर्षीय इसमाचा गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा बसस्थानकालगत असलेल्या चबूतऱ्यावर मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना आज दि.26 ऑक्टोबर रोज मंगळवारला घडली आहे. मृतकाचे नाव सुनिल शंकर जाधव वय 32 वर्ष रा.नांदगाव घोसरी असे असून तो दि.25 ऑक्टोबर रोज सोमवार ला रात्रौ 10:वाजताच्या सुमारास एका खाजगी वाहनाने आपल्या गावातील सहकाऱ्यासोबतच नांदगाव घोसरी येथून निघाला होता. ( Death of an Isma near bus stand )
विकी भोयर रा.मलेझरी जिल्ह्या गडचिरोली नामक ठेकेदार असून तो मजुरांना येरागुंडम येथे सिमेंट फॅक्टरी मध्ये कामासाठी नेत होता. यामध्ये नांदगाव घोसरी परिसरातील 9 मजूर एका खाजगी वाहनाने विठ्ठलवाडा मार्गे प्रवास करीत होते. विठ्ठलवाडा येथे येताच रात्र झाल्याने व सर्व मजूर मद्य प्राशन करून असल्याने विकी भोयर नामक ठेकेदाराने मजुरांना विठ्ठलवाडा बस स्थानका वर झोपण्यास सांगीतले. काही मजूर बसस्थानकालगत असलेल्या दुकानात झोपी गेले तर मृतक हा एकटाच बसस्थानक लगत असलेल्या चबुतऱ्यावर झोपी गेला होता.
हे सुद्धा वाचा: विवाहित महिलांनी पतीला सोडून धरला प्रियकराचा हात…
आज सकाळच्या सुमारास त्याचे सर्व सहकारी जागे झाले . मात्र सुनील झोपूनच असल्याने त्याच्या सोबतत्याने उठविण्याचा प्रयत्न केला मात्र उठलाच नाही. झोपला तो कायमचा. त्याचे अंग थंडगार पडले होते. कडाक्याच्या थंडीने त्याचा मृत्यू झाला असावा असे त्याच्या सोबत्याने सांगितले.
बसस्थानकावर एका इसमाचा मृत्यू झाल्याची बातमी विठ्ठलवाडा गावात पसरली असता बघ्याची गर्दी वाढली.घटनेचे माहिती गोंडपीपरी पोलिसाना देण्यात आली असता पोलीस कर्मचारी घटना स्थळी हजर झाले असून पुढील तपास गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्ग दर्शनात पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम उईके, कोवे करीत आहेत.