नागभीड तालुक्यात पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू |
नागभीड: पोलिस स्टेशन नागभीड अंतर्गत ग्राम कोर्धा येथील इसमाचा पाण्यात बुडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली असून ही आत्महत्या आहे की आणखी काही घातपात यावर साशंकता आहे. गोपाल सदाशिव गायधने वय ३७ वर्ष रा. कोर्या असे मृतक इसमाचे नाव आहे. ( Isma dies after drowning in Nagbhid taluka)
मृतक गोपाल गायधने हा नेहमी प्रमाणे सकाळी ८ वाजताच्या सुमारास कामावर जाण्यासाठी आपल्या पत्नीला जेवनाचा डब्बा तयार करण्यास सांगून तो आपल्या शेतावर गेला दरम्यान दोन तासांनी १० वाजताच्या सुमारास कोर्धा- पांजरेपार रोडवरील मुरुम खदानीच्या पाण्यात एक इसम पोहत आहे, अशी माहिती एका मुलाने गावात येऊन सांगीतली.
हेही वाचा: चंद्रपूर: वेकोली कार्यालयात कर्तव्यावर असताना दारूचा आनंद घेत असलेले कर्मचारी अखेर कॅमेऱ्यात कैद
नागरिक त्या खड्ड्याकडे जाऊन पाहाणी केला असता. गोपाल सदाशिव गायधने चा मृतप्रेत तरंगत दिसला.
याची माहिती नागभीड पोलिसांना मिळताच घटना स्थळ जाऊन गाठून पंचनामा व शवविच्छेन करून घरच्यांना देण्यात आले. इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू कि आत्महत्या याबाबत गुढ कायम आहे.