Chandrapur Corona Latest News |
Chandrapur Corona: जिल्ह्यात बुधवारी (दि.27) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 1 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. ( Chandrapur Corona Latest News)
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 810 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 246 झाली आहे. सध्या 22 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 30 हजार 404 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 40 हजार 206 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1542 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.