५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
वरोरा:- शेगाव येथून जवळच असलेल्या अर्जुनी येथे काल रात्रीला येथील एका ५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. ( Atrocities on 5 year old girl )
सविस्तर वृत्त असे की नवरात्री महोत्सव निमित्याने शारदा देवी जवळ महाप्रसाद चा कार्यक्रम आयोजित केला होता. तर हा कार्यक्रम रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होता. जेवण करून घरी जात असताना अल्पवयीन मुलगी एकटी पाहून मोहल्यात राहणारा नराधम आरोपी शंकर गणेश गजभे यांने ५ वर्षीय मुलीचा हात धरून रस्तालगत असलेल्या गुराच्या गोठ्यात नेले व तिच्याशी अश्लील चाळे करून अत्याचार करीत असल्याचे भयानक दृश्य एका महिलेने पाहिले.
सदर ही महिला कसलीही पर्वा न करता सर्व प्रकार तिच्या आईला सांगितलं, तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पीडित अल्पवयीन मुलीसह पोलीस स्टेशन गाठले व सर्व प्रकार येथील पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी आरोपी शंकर गणेश गजभे वय 27 वर्ष यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहे.