ग्रामसेवकाने केली आत्महत्या
अहमदनगर : उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव – वडघुल या गट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यावरुनउडी घेऊन २४ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेही वाचा: सिंदेवाही: एक विज कोसळली अन् बोकडांसह २६ शेळ्या जागीच ठार
ज्या ठिकाणी ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी आत्महत्या केली होती त्या धबधब्यावरील घटनास्थळी गवांदे यांची बॅग, आयकार्ड, मोटरसायकल मिळाली होती मात्र आठ दिवसांपासून मृतदेहाचा शोध सुरू होता. आठ दिवसांनी आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचा मृतदेह आढळून आला. काल दुपारी त्यांचे मृत शरीर सापडले. या प्रकरणी बीड तालुक्यातील सौंदांडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र खांडगाव – वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासला कंटाळून गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होत असून दोषींवर कारवाईचे करण्याची मागणी मयताच्या पत्नीने केली आहे. हेही वाचा: चंद्रपूर शहरातील बस स्थानक परिसरात युवकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू
या प्रकरणातील उपसरपंच राम घोडके आणि ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत. व्हायरल झालेल्या या रेकॉर्डिंगमध्ये गावातील फॉरेस्ट हद्दीत असलेल्या दिडशे घरांची नियमबाह्य नोंद लावण्यासाठी उपसरपंच राम घोडके यांच्याकडून ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यासोबतच त्यांची इतरही काही कामे घोडके यांनी सांगितले होती. ती करण्यासाठी उपसरपंच राम घोडके हे दबाव टाकत होते.