कारली येथील सर्पदंशाने आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू
तुमसर: तालुक्यातील कारली येथे आदिवासी विद्यार्थिनी शिल्पा महावीर टेकाम (१८) हिचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शिल्पा टेकाम हिला २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कारली येथील घरी सर्पदंश झाला. तिला तात्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला भंडारा येथे रेफर करण्यात जाल. भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हे पण जरूर वाचा: मुलीवर कारमध्ये बलात्कार: अल्पवयीन मुलीवर वडिलांचा कारमध्ये बलात्कार
शिल्पा ही वर्ग १२ वी मध्ये येरली येथील आश्रम शाळेत शिकत होती. तिच्या मृत्यूमुळे कारली गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. टेकाम कुटुंबियांना आदिवासी विकास महामंडळाकडून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अशी मागणी आदिवासी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक उईके यांनी केली आहे.