|
Gosikhurd Flood Live: राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातच गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये (gosikhurd dam) सतत पाऊस पडत असल्याने असल्याने गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट 1 मी. ने उघडलेले असुन 7293 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन सुरू असलेला विसर्ग पुन्हा शक्यता दर्शवली जात आहे. (33 doors of gosikhurd dam open due to heavy rain)
गोसीखुर्द धरणातुन सध्या 7293 क्युमेक्स पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी असे सुचित करण्यात येत आहे.